Team MyPuneCity – इंद्रायणी नदीवरील च-होलीच्या (Alandi) पुलावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या पुलावरील मोठे खड्डे चुकवण्याची कसरत दुचाकी धारकांना करावी लागत आहे. तसेच चारचाकी वाहने ही मोठा खड्डा चुकवताना दिसत आहे.

काही वाहनांची खड्ड्यात चाके आदळत होती. त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट निखळणे,ब्रेकर लायनर निकामी होणे याची शक्यता आहे. दुचाकी स्वारांना त्या खड्ड्यामुळे पाठीचे , मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे.तसेच पाऊस पडल्यावर खड्ड्यात पाणी साचून खड्ड्यां चा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.यामुळे या पुलावरील खड्डे रहदारीसाठी धोकादायक झाले आहेत.
Pimpri : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम; वृक्षारोपण संपन्न
धानोरे बायपास तसेच च-होली रस्ता मार्गे, मोठ्या प्रमाणात वाहने या पुलावरून रहदारी करत असतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे.आळंदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी (Alandi)असते.
Maval: मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
यामुळे दि .१७ जून ते २० जून पर्यंत आळंदी शहरात अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांनाच प्रवेश असून इतर वाहनांना बंदी आहे.बाह्यवळण रस्त्या मार्गे या पुलाचा रहदारी साठी मोठ्या प्रमाणात वापर होणार असून तेथील खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिकांनी केली (Alandi) आहे.