Team MyPuneCity – संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आळंदी पुणे रस्त्यावरील देहूफाटा ते धाकटी पादुका मंदिर ,तसेच देहू आळंदी रोड वरील देहूफाटा ते संत गजानन महाराज मंदिरपर्यंत ( Alandi) काही ठिकाणी रस्त्यांवर लहान मोठे खड्डे दिसून येत आहेत.
यामुळे वाहनचालकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. देहूफाटाजवळील डिव्हायडर जवळसुद्धा खड्डे दिसून येत आहेत. देहू आळंदी रस्त्यावरील काही खड्ड्यात टाकण्यात आलेली खडीसुद्धा वाहनांच्या रहदारी मुळे बाहेर पडली आहे.बाहेर आलेल्या खडीमुळे त्यावरून दुचाकी घसरण्याची शक्यता आहे . तसेच ती खडी मोठ्या वाहनांच्या चाकाखाली गेल्यास ती इतरत्र उडून नागरिकांना इजा होऊ शकते किंवा शेजारील वाहनांना लागून इतर वाहनांचे नुकसान होऊ शकते.


Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!
संत गजानन महाराज मंदिर तसेच आळंदी पुणे रस्त्यावर काही ठिकाणी मोठे खड्डे झाले असून तेथून दुचाकी चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आळंदी पुणे या रस्त्यावरून पालखी रथ पुण्याकडे मार्ग क्रमण करत असतो. यामुळे त्या रस्त्यावरील ठिकठिकाणचे खड्डे बुजवणे गरजेचे आहे. आळंदीतील नागरिकांकडून ते खड्डे बुजवण्याची मागणी होत ( Alandi) आहे.