Team My Pune City –आळंदीतील चाकण चौक समोरील गरुड स्तंभाजवळील पुलावर पुन्हा पावसाने ठिक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत.या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने खड्ड्यांमध्ये आदळत संथ गतीने चालत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
आळंदी मधून चाकण पुणे मार्गे जाणाऱ्या जडवाहनांची तसेच इतर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात येथून होत असते.पुलावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्ड्यातील बारीक खडी पुलावर मोकळी पसरली असून दुचाकी घसरणे किंवा वाहनांमुळे खडी उडून नागरिकांना ,दुसऱ्या वाहनधारकांना व वाहनांना लागणे असे प्रकार घडू शकतात.मूर्ती विसर्जना निमित्त गणेश भक्तांची येथून रहदारी होत आहे.यामुळे पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

देहूफाटा व प्रदक्षिणा मार्गावरील पथ दिवे बंद
आळंदी मधील पुणे रस्त्यावरील देहूफाटा ते धाकटे पादुका मंदिर पर्यंत मुख्य रस्त्यावरील पथ दिवे बंद होते.
तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्गावरील पथ दिवे बंद असल्याने रस्त्यावर काळोख पसरला होता.गणेश विसर्जना निमित्ताने अनेक नागरिक या रस्त्यावरून रहदारी करत असतात.
यामुळे त्या परिसरातील पथ दिवे पालिकेने चालू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकाने केली आहे. काल रात्री संबधीत परिसरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.