Team My Pune City – ऑन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वतःच्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते.
Pune: आयआयएमएस तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा
मग, सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांची यावर उपाय (Alandi Police) म्हणून बहुतेक पोलीस चौकीत गणेशोत्सव साजरा करत असतात.दि.२७ ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाचे ठिक ठिकाणी आगमन झाले.आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत त्यांची मूर्ती पोलीस स्टेशनमध्ये विराजमान करण्यात आली होती.
Paranjape Vidya Mandir : ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात
आज दि.५ सप्टेंबर रोजी आळंदी पोलीस स्टेशन मधील गणपतीची पारंपरिक वाद्याच्या तालात विसर्जन मिरवणुक पार पडली.आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने पालिकेच्या पाण्याच्या हौदात गणरायाचे विसर्जन करून पालिकेच्या संकलन केंद्रात मुर्ती सुपूर्द केली.मिरवणूकीत पोलीस बांधव व भगिनींनी पारंपरिक वेश परिधान केला (Alandi Police) होता.