Team My Pune City -श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी दि. ११ जुलै रोजी आषाढी पालखी सोहळा २०२५ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे परतीचा पालखी सोहळा आळंदी मुक्कामी येणे बाबतचे पत्र दिले होते.
याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांना आज दि.१५ रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,श्री क्षेत्र देहू यांनी पत्रात कळवले आहे की ,दि.२० रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सह ते आळंदी मुक्कामी येत आहेत.
तसेच या पत्रात म्हणले आहे,संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठ गमन वर्षाचा दुग्धशर्करा योग या वर्षाचे औचित्य साधून आपण आम्हा श्री संत तुकाराम महाराज संस्थानला पालखी परतीचे प्रवासात आषाढ वद्य दशमीचे दिवशी आळंदीस मुक्कामी यावे हे निमंत्रण दिले. त्याबद्दल आम्हा समस्त श्री संत तुकाराम महाराज यांचे सर्व वंशज मोरे मंडळींना अत्यानंद झाला आहे.
Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन
सन १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला त्यावेळेस जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदी मार्गेच पालखी प्रवास होत होता त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळत आहे.
Lonvala : सडक्या, उंदरांनी कुरतडलेल्या बटाट्यांचा वापर करून बनवले जातात वडे ,लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

तरी निमंत्रणाचा आम्ही श्री संत तुकाराम महाराज संस्थान व समस्त मोरे वंशज मंडळी स्विकार करत आहे. वरिल आषाढ वद्य दशमी रविवार दिनांक २० रोजी आम्ही पालखीसह आळंदीस मुक्कामी येत आहोत.महाराजांच्या पालखीचे वारकरी परंपरेनुसार स्वागत व्हावे.
याबाबतची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.