Team MyPuneCity – स्वकाम सेवा व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान (Alandi) यांच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त व संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (७५०)सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्री विठ्ठल कृपेतून ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत हा अवतार साकारण्यात आला आहे.हे अलौकिक रूप पाहण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी झाली होती.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पहाटे पासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे भक्तीमय वातावरणात दर्शन घेत होते. अक्षय तृतीये निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
MLA Sunil Shelke : रस्त्यांच्या कामांत दिरंगाई सहन केली जाणार नाही – आमदार शेळके यांचा इशारा
तसेच घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पूर्वजांच्या आठवणीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून छोटी मातीचे मडके भरणे, तर्पण करणे इ .विधी केले (Alandi) जातात.


















