Team My pune city – आळंदी नगरपरिषदेच्या घंटागाडीवर( Alandi News ) हिंदी ऐवजी( स्वच्छते बद्दल)जनजागृती पर मराठी भाषेतील गाणी लावण्याबाबतचे निवेदन मनसेने आळंदी नगरपरिषदेस दिले .हे निवेदन पत्र आळंदी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक अर्चना भिसे यांनी स्विकारले.
तत्काळ दखल घेऊ असे आश्वासन त्यांनी ( Alandi News ) दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश(बापु) घुंडरे पा.तुषार(बाळु) नेटके इ.उपस्थित होते.आळंदी नगरपरिषदेला देण्यात आलेल्या त्या निवेदनात सांगण्यात आले आहे की,आळंदी नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शहरातील स्वच्छता मोहिमेला मनापासून पाठिंबा आहे.
Ransom : गवळी टोळीच्या नावे बांधकाम व्यावसायिकाला 5 कोटींची खंडणी मागणारे चार जण अटकेत
सध्या आळंदी नगरपरिषदेच्या घंटागाडीवर हिंदी भाषेतील गाणी संदेश वाजवले जात आहेत, हे निरीक्षणात आले. परंतु महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा ही राजभाषा असून तिचा वापर प्रशासनात व सार्वजनिक माध्यमांमध्ये अनिवार्य ( Alandi News ) आहे.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये उद्या पाणी नाही!
त्यामुळे, महाराष्ट्रातील नागरी सेवांमध्ये स्थानिक भाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने, घंटागाडीवर हिंदी गाणी संदेश वाजवण्याऐवजी मराठी भाषेतील जनजागृतीपर गाणी संदेश वाजवावेत.यामुळे लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे संदेश पोहोचेल, स्थानिक भाषेला प्रोत्साहन मिळेल, आणि नागरिकांचा सहभागही ( Alandi News ) वाढेल.