Team My Pune City – आळंदी येथे इंद्रायणी नदीवरील वैतागेश्वर मंदिरा जवळील नवीन दर्शनबारीच्या स्कॉयवॉक पुलाखाली एका अंदाजे 40 वर्षीय अनोळखी पुरुषाची हत्या(Alandi Murder News) करण्यात आली. ही घटना गुरुवारी ( दि.18जुलै) रोजी सकाळी उघडकीस आली.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुणे दौऱ्यावर
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पारधी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे इंद्रायणी नदी काठावर असलेल्या वैतागेश्वर मंदिराजवळ गुरुवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून, दगड किंवा कोणत्यातरी घातक हत्याराने अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात तसेच तोंडावर मारून गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारले आहे. दिघी पोलीस तपास करत (Alandi Murder News) आहेत.





















