Team MyPuneCity – आळंदीमध्ये ३ मे ते १० मे रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव सोहळानिमित्त भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन चालू (Alandi) आहे. चाकण रोड येथे भाविकांसाठी भव्य मंडप उभारणी चालू आहे. अवघ्या पाच दिवसांवर सोहळा आला आहे.परंतु शहरातील कचरा व्यवस्थापनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहेत. शहरातील के के हॉस्पिटल समोरील रस्ता,वडगांव रस्ता इंद्रायणी हॉस्पिटल समोरील रस्ता इत्यादी ठिकठिकाणी वारंवार कचरा टाकला जात आहे. त्या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी पालिकेने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.कचरा टाकल्याने तेथील परिसर अस्वच्छ होऊन दुर्गंधी पसरते. याकडे आरिफ शेख यांनी लक्ष वेधले असून अरुण कुरे यांनीसुद्धा गोशाळा गेट, इंद्रायणी हॉस्पिटल समोरील कचाऱ्याकडे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याकडे लक्ष वेधले.
आळंदी येथील कचरा डेपोस दि.२० रोजी आग लागली. सद्यस्थितीत दि.२८ रोजी सुद्धा कचरा डेपोमध्ये त्या (Alandi) आगीमुळे कचरा जळत असून त्या भागात धुराचे साम्राज्य आहे. चार ते पाच दिवस संकलित केलेल्या कचऱ्यास काही आग लागल्याचे दिसून येत आहे. तेथील कचरा आगीमुळे धुपत आहे .संबंधित कचऱ्यास समाजकंटकाकडून आग लावली गेली का?असा संशय नागरिकांमध्ये मनात येत आहे.कचरा डेपोतील आगी मुळे त्या ठिकाणी राखेचे ढीग झाले असून प्रवेश द्वारा जवळील कचऱ्याचे ढीग आगी मुळे धूपत आहेत.प्रवेशद्वार व इतर ठिकाणचे राखेचे ढीग बाजूला न केल्याने अग्निशमन दल वाहनाला पुढील कार्यास अडथळा निर्माण होत आहे.

गेली आठ दिवस आळंदी अग्निशमन दल विभाग त्या कचऱ्याची आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम करत आहे.त्या धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेचे करोडो रुपये खर्च होत आहेत.सद्यस्थितीत कचरा डेपोमध्ये ठिकठिकाणी राखेचे ढीग आहेत.ते बाजूला न केल्याने प्रवेशद्वारा जवळच कचरा संकलित केला जात आहे. परंतु त्याचे वर्गीकरण होताना दिसत नाही. आग लागल्या नंतर चार पाच दिवस नव्याने संकलित केलेला कचरा सुद्धा आगी मुळे जळून धुपत आहे.कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितता नाही. करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने तेथील आगीमुळे पालिकेचे किती नुकसान झाले आहे ,याची माहिती सुद्धा अजून नागरिकां पुढे प्रसारित केली नाही.यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त (Alandi) होत आहे.
रात्रीचे शहर मुख्य रस्ता स्वच्छतेचे काही फोटो विठ्ठल शिंदे यांनी पोस्ट केले असले तरी त्यास प्रति उत्तर म्हणून सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख,अरुण कूरे यांनी के के हॉस्पिटल समोरील रस्ता,४० फुटी रस्ता,वडगांव रोड व इंद्रायणी हॉस्पिटल समोरील कचरा परिस्थितीची माहिती देत कचरा व्यवस्थपनावर टीका केली (Alandi) आहे.