Team My pune city – रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या( Alandi ) अतूट नात्याचा सण आहे. देशभरात बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. त्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतात. भाऊ सुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
L’Oreal India : लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
आज रक्षाबंधना निमित्त श्री संत मुक्ताई संस्थान ,श्री क्षेत्र मुक्ताई नगर यांच्या वतीने श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी वर राखी( Alandi ) अर्पण करण्यात आली.यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या वतीने संत मुक्ताईस साडी चोळी भेट देण्यात आली.

Fraud : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक
ज्ञानदादा व आदिशक्ती मुक्ताई यांचा रक्षाबंधनाचा विलक्षण सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विश्वस्त भावार्थ देखणे,पुरुषोत्तम पाटील ,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्री संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील ,सम्राट पाटील, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले,प्रतिभा पाटील,मीनाताई पाटील, विचारसागर महाराज लाहुडकर मुक्ताई पालखी सोहळा अश्व मानकरी संदीप महाराज भुसे ,मरकळ व भाविक उपस्थित होते.आळंदी शहरात सर्वत्र रक्षाबंधन ( Alandi ) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.