Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल्याच्या कीर्तन नंतर पारायणात सहभागी झालेल्या भाविकांसाठी देवस्थान व ग्रामस्थांच्या संयोजनाने संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.या चित्रपटा मध्ये माऊली माता पिता त्रास, देहांत प्रायश्चित्त,संत ज्ञानेश्वर महाराज व भावंड झालेला त्रास, माऊलींच्या भिक्षा म्हणून झोळीत शेण,ताटी उघडा ज्ञानेश्वरा मधील माऊलीं व मुक्ताई चा प्रसंग असे काही विविध प्रसंग डोळ्याच्या कडा ओल्या करतात तर कधी मन हेलावून टाकतात. संजीवन समाधी सोहळा पाहून अश्रू अनावर होतात.रेड्या मुखी वेद बोलवायला, भिंत चालवली ,चांगदेवाचे गर्व हरण या दृश्यावर अक्षरशः भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
Dehuroad Crime News : इमारतीच्या जिन्यात गांजा विक्रीच्या तयारीत असलेला आरोपी अटकेत; ४६ हजारांचा गांजा जप्त
Maharashtra : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी निमित्त हा चित्रपट भाविकांच्या मनास भावला. चित्रपट संपल्या नंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.सोहळाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.बाकी सप्ताहाच्या दिवसात आमदार शंकर जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी अन्नदान सेवा केली. ग्रामस्थांच्या सप्ताह वेळी अन्नदान नियोजनाचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले.शेवटच्या दिवशी मांडे व आमरस याचे भाविकांसाठी नियोजन करण्यात आले होते. ह भ प मारोती महाराज कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाच्या वेळी एक श्वान कीर्तन एकत बसले होते त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आळंदीत अवकाळी पावसाचा जोरदार हजेरी
रात्री 8 च्या सुमारास आळंदीत अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.दुचाकी व पायी चालणारे अनेक नागरिक भिजताना दिसत होते.पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. काल वडगांव घेनंद ,भोसे व इतर ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार बरसला. रस्त्याच्या कडेने ठीक ठिकाणी पाणी साचलेले दिसून येत होते.