Team My pune city – मराठा समाजाला आरक्षण ( Alandi) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील दि.२९ ऑगस्ट रोजी मुबंई मध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने( दि.२०) काल रात्री ज्ञानदर्शन धर्मशाळेत सकल मराठा समाजाची (आळंदी)बैठक आयोजित करण्यात आली होती.
आंदोलनाच्या निमित्ताने बैठकीत सांगण्यात ( Alandi) आले की, दि.२७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील शिवनेरी येथे मुक्कामी असतील. २८ तारखेला शिवनेरीहून मुबंईच्या दिशेने,मंचर राजगुरूनगर, चाकण ,तळेगाव , लोणावळा मार्गे ते मार्गस्थ होतील.
दि.२७ रोजी ते दि.२८ दुपार पर्यंत आंदोलनात ( Alandi) सहभागी होणाऱ्या काही मराठा बांधवांची राहण्याची व्यवस्था आळंदीत केली जाणार आहे. तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तीन ते चार दिवस शहरात रिक्षा किंवा पिकअप(छोटा टेम्पो)मधून स्पीकरद्वारे जनजागृतीपर प्रचार होईल. शहरात बॅनर,फ्लेक्स लावण्यात येतील.
Lonvala Crime News : लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या सरीत चोरट्यांचा डाव; दोन फ्लॅटमध्ये 5 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास
दि.२८ ला आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी आळंदी व परिसरातील गावातून शिदोरी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुपारी भैरवनाथ चौक येथून या आंदोलनात सहभागी होण्याऱ्या आंदोलन कर्त्यांसाठी वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दुपारी( Alandi) ती मार्गस्थ होतील.