Team MyPuneCity – यंदाच्या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे. दरवर्षी प्रस्थान सोहळा हा दुपारी चार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होत असतो. यंदाच्या वर्षी प्रस्थान सोहळा गुरुवारी (ता. १९) आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवार माऊलींच्या पालखीची पहिली मंदिरात प्रदक्षिणा होणार आहे.त्यानंतर आरती ,आरती झाल्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात होणार आहे.
वारकरी भाविकांना कष्ट होऊ नयेत आणि पालखी प्रस्थान सोहळ्यास दिरंगाई होऊ नये यासाठी यंदाच्या वेळी नित्य गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा सूर्यास्तानंतर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काढली जाईल. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम साडे सातच्या वेळेस होईल.
Heavy Rains : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; रस्ते जलमय, मंदावला वाहतुकीचा वेग

त्यानंतर पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यास दिंड्या देऊळवाड्यात घेऊन सुरूवात केली जाणार असल्याने माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान साधारण रात्री आठच्या दरम्यान होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.यावेळी विश्वस्त राजेंद्र उमाप ,विश्वस्त
रोहिणी पवार उपस्थित होते.