situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : माऊली…. माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा (Alandi) पालखी प्रस्थान सोहळा आज दि.19 रोजी पार पडत आहे. यानिमित्ताने लाखो वारकरी भाविकांचे आळंदीमध्ये आगमन झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच दिंड्यांचा ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष चालू होता.


लहानांपासून ते ज्येष्ठ अशा सर्वांमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उत्साह दिसून येत होता. सायंकाळी 7 वाजता हरिनामाच्या गजरात दिंडीने मंदिरात प्रवेश केला. खांद्यावर पताका,मृदुंगाचा, टाळ्यांचा लय बद्ध आवाज ,माऊलीं तुकारामाच्या जयघोष अश्या भक्तिमय (Alandi) वातावरणात सोहळा सुरू झाला.वारकरी भाविक मानवी मनोरे,फुगडी तसेच हरिभजनात दंग होऊन होत नृत्य करत होते .या सोहळ्याला पावसाने जोरदार हजेरी लावली होती.तरी वारकरी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता.

PCMC : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत…


रात्री 9 च्या सुमारास एकनाथ पाराजवळ अश्वांचे आगमन झाले होते. यावेळी अनेक वारकरी भाविकांनी माऊलींच्या अश्वांचे दर्शन घेतले. श्री गुरु हैबतराव बाबा यांचेतर्फे श्रींची आरती, संस्थानतर्फे श्रींची आरती, मानक-यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात (Alandi) आला.

Shri Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या १५ व्या अहवालाचे प्रकाशन

वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये श्रींच्या चल पादुकांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. संस्थानतर्फे मानक-यांना मानाची पागोटी वाटण्यात आली. श्रीगुरु हैबतराव बाबातर्फे दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित ,मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात करण्यात आले . श्रींचे समाधीजवळ नारळ वाटप करण्यात आले.
श्रींच्या पालखीचे वीणा मंडपातून रात्री पावणे अकराच्या सुमारास माऊली माऊलीच्या जयघोषात प्रस्थान झाले. पालखीने माऊली मंदिर प्रदक्षिणा केली.पालखी महाद्वारातून प्रदक्षिणामार्गे भरावरस्ता- भैरवनाथ चौक – हजेरी मारुती – चावडी चौक – महाद्वार चौकातून दर्शन मंडप मुक्कामी (Alandi) असेल.

Follow Us On