Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा (Alandi)आज दि.19 रोजी पार पडत आहे. यानिमित्ताने लाखो वारकरी भाविकांचे आळंदीमध्ये आगमन झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर वारकरी भाविकांची मोठी गर्दी आहे.तसेच दिंड्यांचा ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष चालू आहे.पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नाना करीता इंद्रायणी घाटावर बहुसंख्येने भाविकांची गर्दी आहे. लहानांपासून मोठ्या वयाच्या वारकऱ्यांमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त त्यांच्या मध्ये उत्साह दिसून येत आहे.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी नदपलिकडील दर्शन मंडपा आत भाविकांची गर्दी दिसून येत होती.
स्काय वॉक पूल मार्गे फॅब्रिकेटेड पूल (Alandi) अशी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रस्थान सोहळ्या निमित्ताने सायंकाळी 7 वाजता हरिनामाच्या गजरात दिंडीने मंदिरात प्रवेश केला. खांद्यावर पताका, मृदुंगाचा, टाळ्यांचा लय बद्ध आवाज ,माऊलीं तुकारामाच्या जयघोष अश्या भक्तिमय वातावरणात सोहळा सुरू झाला.
Shri Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या १५ व्या अहवालाचे प्रकाशन
जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,विश्वस्त योगी निरंजन नाथ,विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे,विश्वस्त रोहिणी ताई पवार,विश्वस्त पुरूषोत्तम महाराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेला असून त्याचे लोखंडी संरक्षण कठडे पाण्याने वाहून गेले (Alandi) होते.