situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदीच्या सिद्धबेट परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच

Published On:
Alandi

पावनभूमीच्या पावित्र्यावर गालबोट

Team MyPuneCity – संत निवृत्ती महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वास्तव्य लाभलेली व त्यांच्या लीलांनी पावन झालेली सिद्धबेट परिसर सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात अडकत चालल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून येत असून, हा परिसर मद्यपींचे अड्डे बनत चालल्याची गंभीर शक्यता व्यक्त( Alandi) होत आहे.

सिद्धबेट परिसर ऋषीमुनींच्या तपश्चर्येचे स्थान असून, भाविक मोठ्या श्रद्धेने या स्थळाला भेट देतात. मात्र, अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक येथे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा खुलेआम फेकताना दिसत आहेत. यामुळे परिसराची स्वच्छता धोक्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने या परिसरात मद्यपान केलं जातं का, असा सवाल उपस्थित होतो आहे.

Crime News : सराईत गुन्हेगार ‘आक्या बॉण्ड’सह २६ गुन्हेगार तडीपार

या पवित्र भूमीचा अपमान होत असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये प्रखरतेने दिसून येते. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या वतीने परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण आणि संरक्षण यासाठी विविध उपक्रम राबवले गेले होते. काही भागात सिमेंट कोबा, पत्र्याचे शेड आणि बागकामाची कामेही झाली होती. तसेच पालिकेकडून येथे कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. यामुळे काही काळ मद्यपींवर नियंत्रण ( Alandi) आले होते.

मात्र, सध्या पुन्हा एकदा येथे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. प्रवेशद्वाराजवळील रस्ता मातीने खचत असून, पावसाळ्यात चिखलामुळे भाविकांना चालणेदेखील कठीण जाते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे सिद्धबेट कडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, असे जाणवते.

सिद्धबेटसारख्या ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थळाचा अपवित्र वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून येथे कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत ( Alandi) आहे.

Follow Us On