situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन

Published On:

Team My Pune City -आळंदी येथील स्वामी समर्थ नगर या ठिकाणी सतत १५ दिवसा पासून बिबट मादी आणि तिचे २ पिल्ले सह विशाल थोरवे यांचे ऊस शेती मध्ये वास्तव्यास असून सतत नागरिकांना दिसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय चाकण येथील अधिकारी कर्मचारी सतत गस्त करून लोकांमध्ये वेळोवेळी जनजागृती करत आहे .परंतु सदर ठिकाणी बिबट व पिल्ले तिथून जागा सोडत नसून नागरिक खुप घाबरले आहेत.

संबंधित विषयावर शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक याचे मार्गदर्शना खाली बिबट निवारण केंद्र येथील महेश ढोरे याची टीम आज आळंदी मध्ये दाखल झाली.वनाधिकारी यांनी तेथील परिसराची पूर्ण पाहणी केली.बराच दिवस बिबट्या त्या परिसरात वास्तव्यास असल्याने स्थानिक नागरिकांचे भीतीबद्दलचे म्हणणे ऐकून घेतले. तेथील स्थानिक नागरिकांना आधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी वनपरीक्षेत्र आधिकारी संतोष कंक म्हणाले बिबट्या बरोबर दोन पिल्ले आहेत.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्यास पिल्लू अडकल्यास बिबट मादी आक्रमक होऊन इतरांना वर हल्ला करेल.

तसेच मादी पिंजऱ्यात गेल्यास पिल्लांना शिकारीचे ज्ञान नसल्याने तेथील परिसरात बाहेर निघून इकडे तिकडे फिरतील.पिल्लांना अजून शिकारीचे ज्ञान नसल्याने बरोबर आहेत ते ज्ञान अवगत झाल्यावर ते तिच्या पासून वेगळे होतील.परिसरातील लहान मुलांची काळजी घ्यावी. त्यांना एकटे बाहेर सोडू नये.
रात्रीचे एकटे बाहेर पाठवू नये.खरकटे बाहेर टाकू नये जेणे करून कुत्रा ते खाण्यासाठी त्या परिसरात येईल.

व तो कुत्रा बिबट्याचे भक्ष्य बनेल.रात्रीचे घरा बाहेरील दिवे चालू ठेवावेत.उघड्यावर शौचास बसू नये.मोबाईलचे गाणे अथवा तोंडयाने गाणे म्हणत आवाज करत जावे.रात्री बाहेर पडताना मोठ्याने आवाज करावा, रात्री अपरात्री बाहेर पडताना हातात काठी घ्यावी इ.

Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक

MLA Mahesh Landge : उद्योग क्षेत्रातून टॅक्स घेता, मग सुविधा का देत नाही?

संजय घुंडरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भीती बद्दल माहिती दिली. तसेच वेळोवेळी त्या परिसराची माहिती घेत असल्याचे सांगून ते वनविभागाला कळवत होते.असे यावेळी ते म्हणाले. सचिन पाचुंदे हे सुद्धा वन विभागास कळवते होते.असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी वनपरीक्षेत्र आधिकारी संतोष कंक , वनपाल ए एम इंदलकर, वनरक्षक अचल गवळी नवनाथ पगडे, दिपाली, रावते तसेच माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथील महेंद्र ढोरे तसेच स्थानिक नागरिक विशाल थोरवे,संजय चव्हाण, विकास पाचुंदे,अनिल वाघमारे,सोमनाथ दळवी,
समाधान पाटील,नांगरे महाराज,घुले , मुंढे,जाधव ,वैद्य व इतर नागरिक उपस्थित होते.

उपाय योजना

वनरक्षक टीम द्वारे तीन ते चार दिवस रोज सायंकाळी ठरलेल्या एल क्षेत्रात फटाके वाजवणार ज्यामुळे त्याला त्या आवाजाने तेथील परिसर असुरक्षित वाटेल व तो पिल्लांसह तेथून निघून जाईल.

बिबट्या व पिल्लांच्या हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवणार

जर बिबट्या निघून गेला नाही तर थर्मल ड्रोन द्वारे पाहणी व बिबट्या त्या परिसरातून निघून जावा यासाठी वनरक्षक टीम नियोजन पूर्वक प्रयत्न करणार

वन्यप्राण्यांबाबत ग्रामस्थानी घ्यावयाची दक्षता….

१. कामानिमित्त वाडी वस्ती ते शेत त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत जा ये करताना शक्यतो समुहाने जावे.

२. विविध जत्रा-जत्रा ऊरुस हंगाम या कालावधीत वाडी वस्ती वरुन रात्रीच्या वेळी घरी जाताना विशेष काळजी घ्यावी.

३. शेतात वाकुन काम करताना बिबट्याने पाठीमागुन हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ग्रामस्थांना याबाबत विशेष दक्ष रहावे.

४. बिबट्याने मनुष्य प्राण्यावर किंवा आपले पशुधनांवर हल्ला केल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयास द्यावी.

५. संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडु नये. घडलेल्या घटनांमध्ये लहान मुले/स्त्रिया यांच्याबाबत रात्रीचे वेळेस संघर्ष झालेला आहे. तरी त्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. अंगणात परिसरात विजेचा दिवा चालु ठेवावा. शक्य त्या वेळेस अंगणात शेकोटी पेटती ठेवावी.

६. कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. आपल्या पशुधनाची रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधनी करताना गोठा सर्व बाजुंनी बंदिस्त राहील त्याची दक्षता घ्यावी.

७. गुरख्यांनी आपली गुरे चरायला घेवुन जाताना जमावाने जाणे. गावापासुन दुर तसेच वनांचे खुप जवळगुरे चरायला घेऊन जावु नयेत.

८. बिबट्याचे संदर्भात प्राप्त होणाऱ्या चुकिच्या बातम्या, अफवा पसरवु नयेत व त्यांच्यापासुन दुर रहावे.

९. मोबाईल अथवा रेडीओवर गाणी चालु ठेवुन, शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगुन सहकार्याबरोबर शेतास पाणी द्यावे. रात्रीच्या वेळी हे अत्यंत आवश्यक.

१०. कधीही बिबट्याच्या पाठलाग करु नये. कारण तो घाबरुन उलटा हल्ला करु शकतो.

११. बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरडा करावा. खाली वाकु नये किंवा ओनवे झोपु नये.

१२. रात्री उघड्यावर झोपु नये.

१३. गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्याच हिताचे आहे.

१४. कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करु नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनु शकतो

Follow Us On