Team MyPuneCity -आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर आढळून आला आहे.स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीच्या जवळील परिसरात थोरवे यांच्या उसाच्या शेतात स्थानिक नागरिकांना तो दिसला.
नागरिकांनी वनरक्षकांशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र आधिकारी कंक साहेब यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक नवनाथ तत्काळ घटनास्थळी पोहचले.
त्यांनी स्थानिकांना मार्गदर्शन केले.उद्या सकाळी परत पाहणी करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.
Alandi: आळंदी शहरात पावसामुळे ठिक ठिकाणी खड्डे


गोविंद वैद्य, गोकुळ मुंढे ,अशोक जाधव व उमेश गिद यांनी ऊसाच्या शेतात बिबट्या पाहिला असे यावेळी सांगितले. यावेळी सचिन पाचूंदे ,प्रसाद बोराटे,विशाल थोरवे,संजय चव्हाण,गोविंदा कुऱ्हाडे, समाधान पाटील,महेश कुऱ्हाडे व इतर स्थानिक होते.