बिबट्याने हल्ला केल्यावर माणूस मेल्यावर उपाय योजना करून काय उपयोग? स्थानिक नागरिक
Team My Pune City -आळंदी ग्रामीण भागातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठी मागील परिसरात जवळपास एक महिना भर बिबट्याचे वास्तव्य आहे.वारंवार स्थानिक नागरिकांना तेथील शेतात ,शेतातील झाडावर व घरा जवळ ,तेथील रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून येत आहे.
यामुळे तेथील नागरिक भयभीत होऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांची होत आहे.वरिष्ठ वन विभागाकडे याबाबत गोकुळ मुंढे यांनी निवेदन दिले आहे. यात त्यांनी त्वरित वन विभागाची टीम पाठवावी,कॅमेऱ्यांची व्यवस्था करून हालचालीचे निरीक्षण करावे,आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्यास पकडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
बिबट्या दिवस भर शेतात राहत असला तरी शेत परिसराच्या आजू बाजूने मोठी लोकवस्ती आहे. आजू बाजूला अनेक इमारती घरे आहेत.यामुळे काहींना त्यांच्या घराजवळ रस्त्यावर बिबट्याचा वावर आढळून येतो.
स्थानिक नागरिक प्रतिक्रिया
एका व्यक्तीच्या घरा जवळील रस्त्यावर मुंगूस होते त्यावर त्या झडप घातली.तसेच ते म्हणाले चुकून माझ्या वर ही त्याचा हल्ला झाला असता तर हा प्रश्न उपस्थित केला.
तर दुसरे स्थानिक नागरिक म्हणाले घरा समोर ऊसाचे शेत आहे.तेथील झाडावर बिबट्या बसतो.घराच्या खिडकीतून वारंवार बिबट्या नजरेस पडतो.येथे लहान मुले आहेत, रात्रीची लोक कामा वरून येणारी आहेत.वारंवार प्रशासनास माहिती दिली.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
प्रशासन( वनविभाग) येत आहे तुम्ही काळजी घ्या.मुलांची काळजी घ्या.येथील परिस्थिती चाकण येथील वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन सांगावी.असे वनरक्षक म्हणत आहेत.बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल सांगता येत नाही.प्रशासनाने पिंजरे लावावेत .बिबट्याचा बंदोबस्त करावा.माणूस मेल्यावर उपाय योजना करून काय उपयोग?
यावेळी स्थानिक महाराज म्हणाले या गल्लीत लहान लहान मुले आहेत.मुलांना भीती पोटी नीटसे क्लास ला जाता येत नाही,संध्याकाळी ,रात्री कामावरून माणसे येतात, कालच बिबट्या रस्त्यावर सुध्दा आला . या परिसरात भीतीचे वातावरण आहे .कृपया शासनाने व वनविभागाने यावर कठोर पाऊल उचलावे व बिबट्याचा बंदोबस्त करावा.
बिबट्या बरोबर पिल्ले आहेत. पिंजरा लावल्यास पिल्लांना इजा झाल्यास बिबट्या आक्रमक होईल.आक्रमक झाल्याने माणसांवर हल्ला करेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून उपाय योजना करू. असे वनरक्षक वेळोवेळी सांगत आहेत.