Team My Pune City –आळंदी नगरपरिषद तर्फे सन २०१८ पासून (Alandi) प्रलंबित असलेल्या वारसा नियुक्ती प्रकरणाला अखेर न्याय मिळाला आहे.
सुनील भीमराव गालफडे यांना लाड पागे वारसा नियमानुसार वाहचालक (वर्ग–३) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांचे वडील भीमराव गालफडे, हे सन २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर वारस हक्काने नियुक्तीसाठी सुनील गालफडे यांनी वेळोवेळी अर्ज सादर केले होते, मात्र विविध कारणांमुळे हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित राहिले.
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
Sahara Old Age Home : गणेशोत्सवानिमित्त सहारा वृध्दाश्रमात हभप मोरे महाराज यांची किर्तन सेवा
शेवटी तब्बल ७ वर्षांनंतर, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आस्थापना विभाग प्रमुख मयुरी पाटोदकर यांनी शासन परिपत्रके व शासन निर्णयांचा आधार घेऊन प्रस्ताव तयार केला आणि त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या नियुक्तीमुळे सफाई कामगार कुटुंबांचे जीवनमान व आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी लाड पागे समितीच्या उद्दिष्टांना खरे मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.