Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन मंदिरामध्ये काल दि.२८ रोजीह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांची पसायदान या विषयावर प्रवचन सेवा ( Alandi ) करत असताना त्याची प्रस्तावना सांगितली.
ती प्रस्तावना सांगत असताना ते म्हणाले, ज्ञानोबारायांच्या शब्दातून व्यक्त होणारी जगत् हिताची तळमळ आणि या तळमळीच्या अभिव्यक्तीला कारण असणारी सद्गुरू कृपा या सगळ्या गोष्टी पसायदानातून व्यक्त झालेल्या दिसून येतात. पसायदान हे सर्वश्रुत असले व ज्ञात असले ,जरी ते सर्वांच्या मुखात असले तरी एक अडचण निर्माण झाली. पसायदान मुखोदगतअसल्यामुळे व इतर कारणाने त्या पसायदानाच्या अर्थाकडे ,ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेल्या पसायदानाच्या मागच्या भावाकडे म्हणावं तितके लक्ष दिले जात नाही.
पसायदान ही एक प्रार्थना आहे. यामध्ये दोन भाव व्यक्त करावे लागतात. एक अपेक्षा व दुसरे समर्पण.
प्रार्थनेमध्ये अपेक्षा असते. समर्पणाशिवाय प्रार्थना पूर्ण होत नाही. यावेळी त्यांनी अपेक्षा व समर्पण याविषयी उदाहरणासह त्यांची माहिती दिली.पसायदानाला एक तत्वदृष्टी आहे, भक्ती भूमिका, कर्मनिष्ठता ,योग आहे . पसायदानामध्ये नाही असे या जगाच्या पाठीवर काहीही नाही. श्रेयाची प्राप्ती आणि पेयाची निवड दोन्ही भूमिका ज्ञानोबारायांनी बारकाईने सांगितल्या आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रार्थने मध्ये जी आपुलकी आहे, जो गोडवा आहे, जी आत्मीयता आहे जे ममत्व आहे शब्दांची ज्या पद्धतीने मांडणी आहे, भावाची अभिव्यक्ती ज्या भूमिकेतून झाली आहे.ज्या भूमिकेवर गेल्या नंतर जगताच्या संबंधाने भाव निर्माण होण्याचे कारणच राहत नाही. अश्या भूमिकेवर ज्ञानोबाराय असताना जगताच्या कल्याणच्या भूमिका पायऱ्या पायऱ्यांनी ते मांडत जातात. म्हणून जगताच्या पाठीवरची प्रार्थना म्हणण्याच्या योग्यतेची एकच प्रार्थना वाटते ते म्हणजे पसायदान.
पसायदानासारखी दुसरी प्रार्थना नाही. निवृत्ती महाराज,सोपान काका,तुकोबाराय,नाथ महाराज यांना या प्रार्थनेचे गांभीर्य माहीत आहे. त्यांना गांभीर्य कळत असेल आणि आपल्याला कळत नसेल तर आपण आपल्या ज्ञानाच्या संबधाने गंभीर होण्याची गरज आहे. पसायदान पाठांतर याबाबत तोंडपाठ कानपाठ याबाबत त्यांनी माहिती दिली. पसायनदानातील आपण जे काही शब्द म्हणतो त्याचे दोष व त्याची माहिती दिली. ते कसे म्हणावे याबद्दल( Alandi ) सांगितले.
ज्ञानेश्वरांची प्रार्थना म्हणजे एक तत्वज्ञाने, संताने , मानसशास्त्रज्ञाने ,समाजशास्त्रज्ञाने,अर्थशास्त्रज्ञाने केलेली प्रार्थना आहे. या पलीकडे जाऊन मनुष्य रुपात आल्यानंतर मनुष्यत्व धर्माचे ज्याला यथार्थ ज्ञान आहे, त्या मनुष्य धर्माच्या परिपूर्णत्वाची केलेली ती एक प्रार्थना आहे.
ज्ञानोबारायांना समाज म्हणजे काय ?माहित आहे,सामाजिक अंतरंग त्यांना कळतात, सामाजिक परिवर्तनाच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आणि प्रगल्भ आहेत. त्या परिवर्तना करिता लागणाऱ्या साधन परंपरेचे त्यांना यथार्थ ज्ञान आहे. त्या साधन परंपरा कोणत्या पध्दतीने आचरणात याव्यात या पद्धतीतच ज्ञानोबारायांना यथार्थ ज्ञान आहे.
नुसते ज्ञान नाही , इतरांपर्यंत पोहचवणे व स्वतः च्या कृतीतून व्यक्त करून दाखवण्याचे कौशल्य ही ज्ञानोबारायांजवळ आहे. संतत्व या वृत्तीला जर शब्दाचा आकार दिला त्याला पसायदान म्हणा,अशी व्याख्या चैतन्य महाराज यांनी यावेळी सांगितली. पसायदान हे संतांच्या मुखातून व्यक्त झाले. यापेक्षा ते व्यक्त झालेले शब्द आहेत ना ते संत आहेत,असे यावेळी ते म्हणाले. जगताचे भले व्हावे व सर्व सुखी व्हावे हे मागणे मागितले आहे.
संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या मागे पसायदानात व्यक्त झालेली तळमळ आहे. संपुर्ण पसायदानाच्या मागे ज्ञानेश्वरीचा भाव आणि अर्थ उभा राहिला आहे. पसायदान ज्या भूमिकेतून ,तळमळीने व्यक्त झाले आहे, ज्या भावनेतून व्यक्त झाले आहे त्या भावाची उत्कटता ज्ञानेश्वरीच्या निर्मितीची( Alandi ) मागे लपली आहे.
संपूर्ण पसायदाना मध्ये ज्ञानेश्वरीचे पूर्ण प्रतिबिंब जसे आहे तसे पडले आहे.पसायदानाच्या प्रत्येक ओवीच्या मागे ज्ञानेश्वरीच्या अध्याया अध्ययाचे संदर्भ दिसून येतात.हे पसायदान ज्ञानोबारायांनी सद्गुरू जवळ मागितले.कोणा करता मागितले तर जगताच्या कल्याणाकरता मागितले.पसायदान हा क्रम आहे त्या कर्मानेच पुढे गेले पाहिजे.असे त्यांनी यावेळी ( Alandi ) सांगितले.
ज्ञानोबारायां एवढा मोठा मानसशास्त्रज्ञ याच्या पूर्वी कोणी जन्माला आला नाही आणि पुढे होणार ही नाही.समाज मन ओळखणे ,समाजाची नाडी पकडणे, ती नाडी पकडून सामाजिक परिवर्तन भूमिका इतक्या प्रगल्भपणाने मांडले ते पण ,वयाच्या सोळाव्या वर्षी.
मानवी जीवन बदलावे,समाजपरिवर्तन व्हावे,जे चांगले आहे ते सिद्ध,निश्चित व्हावे.त्याच्या मध्ये त्यानंतर परिवर्तन होऊ नये या भूमिकेत माणसांनी जावे.परिवर्तन हे अपूर्णेत होत.परीपूर्णेत परिवर्तन नसते.याचे उदाहरण देत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
पसायदाना मध्ये अजून एक विशेष आहे, व्यक्ती मध्ये परिवर्तन व्हावे महत्वाचे नाही तर वृत्ती मध्ये परिवर्तन व्हावे.वृत्ती परिवर्तन हे व्यक्ती परिवर्तना पेक्षा सूक्ष्म असते.दुरोगामी परिवर्तन करणारे आणि स्थिर रहाणारे परिवर्तन असते.आतून किती बदललो हे महत्वाचे आहे. बाहेरून बदल्या सारखे किती दाखवले हे महत्वाचे नाही.जेव्हा बाह्य परिवर्तन होते तेव्हा तो प्रदर्शनाचा विषय असतो.वृत्ती परिवर्तन हा प्रदर्शनाचा विषय नाही तो अभिव्यक्तीचा विषय होऊन ( Alandi ) जातो.
पसायदान हा वृत्ती परिवर्तनाचा विषय आहे. वृत्ती परिवर्तनातून समाज घडत असतो.याबाबत त्यांनी समाजातील उदाहरणे देत माहिती सांगितली.पसायदाना मध्ये ज्ञानोबारायांनी ज्या मागण्या मागितल्या त्या बारकाईने बघितल्या तर मानवी जीवनाच्या कल्याणच्या मागण्या आहेत.
या मानवी जीवनाच्या कल्याणच्या मागण्या असल्या तरी या मागण्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साध्याची मागणी केली नाही ,सगळ्या मागण्या साधन परंपरेच्या आहेत. याबाबत त्यांनी साध्य व साधन बाबत माहिती दिली. माणसाला जेव्हा आयते साध्य प्राप्त होते, त्याच्या प्रेरणा संपून जातात. प्राप्तीच्या प्रेरणा जिवंत राहणे,हे आपल्या मनुष्यत्वाचे पर्यायाने आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे. मनुष्यत्व हरवणे समाजाला घातक आहे,असे यावेळी त्यांनी सांगितले.
सर्वांच्या कल्याणा करता आपल्या सद्गुरू चरणाजवळ अत्यंत महत्वाचे मागणे मागितले आहे. जे मागणे नित्य म्हणल्याने ,नित्य अंतःकरणामध्ये ठेवल्याने ज्या मागणीचा यथार्थ अभ्यास केल्याने आपल्या वृत्ती परिवर्तनातून जीव दशेपासून ,ब्रम्ह स्वरूपतेचा आपाला प्रवास ज्ञानोबारायांच्या कृपेने कर, सहज,आनंददायी होईल अशी पसायदान प्रार्थना ज्ञानोबारायांनी मागितली. त्याचा ओवीश्या माहिती ते पुढील प्रवचनात देणार ( Alandi ) आहेत