Team MyPuneCity-महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मावळ परिसरात होत असलेल्या जोरदार पावसा मुळे आज दि.२६ रोजी इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली दिसून आली.
आळंदी येथील भक्त पुंडलिक मंदिरात पाणी जाऊन मंदिरा भवती पाण्याने वेढा घातला असून तेथील दगडी घाट पाण्या खाली गेला आहे.तसेच काहीश्या प्रमाणात पाणी भक्ती सोपान पुलावरून गेले होते.त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्या खाली गेले आहे.आज सकाळी अकराच्या सुमारास भक्ती सोपान पुलाच्या पाणी खाली होते दुपारी हळूहळू पाण्याची पातळीत वाढ होऊन सायंकाळी त्या पुलास पाणी खेटले व काही प्रमाणात त्या पुलावरून पाणी गेले.
PCMC: प्रशासकीय कामांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर नागरी सेवा सुलभीकरणाला गती देणारा – संकेत भोंडवे
इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सिद्धबेट बंधाऱ्यातील जलपर्णी वाहत होती.ती वाहून काहीशी भक्ती सोपान पुलावर अडकून बसल्याचे चित्र दिसून येत होते. पावसामुळे नदी जलपर्णी मुक्त होत असल्याचे समाधान यावेळी काही नागरिकांनी व्यक्त केले.इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने नदीपात्रा जवळ कोणी जाऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.ठिक ठिकाणी बॅरिगेट्स लावण्याचे कार्य पालिकेच्या वतीने सुरू आहे.

इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे, नागरिकांनी पुलाचा वापर करू नये तसेच घाटावरही पाणी वाहत आहे, नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.
आपत्तीजनक परिस्थितीत खालील क्रमांकावर संपर्क करावा.संजय गिरमे अभियंता. +919823971598
प्रसाद बोराटे. +918007720072