Team My Pune City –आज दि.२६ रोजी हरितालिका तृतीया निमित्तइंद्रायणी घाटावर महिलांची गर्दी होती.हरितालिका व्रता निमित्त वाळूचे शिवलिंग नदी घाटावर तयार करून त्याची मनोभावे पूजन महिला करत होत्या. शिवलिंगासोबत सखी-पार्वतीची मूर्तीचे पूजन केले जाते.
शहरातील अनेक महिला घरोघरी चौरंग -पाटावर याचे(Alandi) पूजन करत होत्या.पुजना साठी लागणाऱ्या वस्तूंची (वाळू, हळदी, कुंकू,बेल,शमी,दुर्वा,नारळ,कापूस वात, फळे , फुले, पाने, मूर्ती,अगरबत्ती,गूळ खोबरे, इ.साहित्य वस्तूंची)इंद्रायणी घाटासह शहरात ठिक ठिकाणी तात्पुरती दुकाने लागली होती.
अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रध्देने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते.या दिवशी सुवासिनी पतीच्यादीर्घायुष्यासाठी,आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव शंकर आणि देवी पार्वतीची मनोभवे पूजन करतात.अनेक ठिकाणी कुमारिका ही हे व्रत करतात.
Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार
PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल
चांगला पती मिळावा यासाठी त्या व्रत करतात.गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते.हे व्रत करताना महिला उपवास करतात.हरितालिका म्हणजे सौभाग्याचा सोहळा,प्रेमाचा उत्सव आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं पती पत्नीच्या भावबंधाचा हा सण आहे.
