Team MyPuneCity -श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटी व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने याचे आजोजन करण्यात आले होते.या सोहळ्यास वस्तू रुपी तसेच देणगी स्वरूपात ज्यांचे सहकार्य लाभले त्या भाविकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आज दि.15 रोजी आयोजित करण्यात आला.
आळंदी नगरपरिषद आधिकारी कर्मचारी,आळंदी पोलीस स्टेशन यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजना बद्द्ल त्यांचा सन्मान करण्यात आला.विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था ,राऊत बाबा यांचे विद्यार्थी, आळंदीकर ग्रामस्थ मंडळ,स्वकाम सेवा ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ,पिंपरी चिंचवड सेवेकरी अश्या विविध संस्थांच्या कर्मचारी,कार्यकर्त्यांनी,सेवेकऱ्यांनी भोजन व्यवस्थेच्या कार्यात मदत केली. त्यांचा सुध्दा यावेळी सन्मान करण्यात आला.
Alandi: आळंदी ग्रामीण हद्दी परिसरात बिबट्याचा वावर
यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त योगी निरंजन नाथ,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर,वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके,विजय भाऊ जगताप,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व ग्रामस्थ ,वारकरी मान्यवर उपस्थित होते.
Alandi: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा
