Team MyPuneCity –श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने दि.२५ रविवार रोजी डुडूळगाव येथील वेदश्री तपोवन येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा.पर्यत पार पडणार आहे.या शिबिरास प.पु. गोविंददेव गिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप व लहानांपासून ते जेष्ठां पर्यंत आरोग्य तपासणी यासाठी बालरोग तंज्ञ व अस्थीरोग तज्ञ डॉक्टर ही सेवा पूर्ण करणार आहेत.आरोग्य तपासणी वेळी मोफत डॉक्टरांचा सल्ला ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
Weather Update: संपूर्ण राज्याला उद्या रेड अलर्ट; मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
वेदश्री तपोवन समिती,महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान ,स्वराज ग्रुप,जय गणेश ग्रुप व आळंदी देवाची ग्रामस्थांचे या शिबिरास सहकार्य लाभले आहे. शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या शिबिराचा लाभ घ्यावा.