Team My pune city – दि.११ रोजी आळंदी नगरपरिषदेच्यावतीने शहर स्वच्छतेबाबाबत आवाहन करण्यात आले होते. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर ५०० रु. दंड असे (Alandi) जाहीर करण्यात आले होते. शहर स्वच्छते बाबत व कचरा टाकणाऱ्यांवर दांडात्मक कारवाईबाबत पालिकेने काही ठिकाणी सूचना फलक ही लावले आहे.
Sunil Shelke: रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
या सूचना फलकामध्ये लिहिले आहे की,सदरील जागेत नागरिकांनी कचरा टाकल्यास आपणावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कचरा टाकण्यासाठी कृपया घंटागाडी व ट्रॅक्टर वापर करावा. माझे आरोग्य माझी जबाबदारी…!स्वच्छ आळंदी …सुंदर आळंदी…! परंतु काही नागरिक याच ठिकाणी कचरा टाकत असल्याने विदारक चित्र दिसून येत (Alandi) आहे.
Rotary Club : समाजातील वंचित घटकांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा -भगवान शिंदे
फलकावर दांडात्मक कारवाई लिहीले असून त्याकडे दुर्लक्ष करून त्यासमोरच कचरा काहीजण टाकत असल्याने येणारे जाणारे नागरिक ते विदारक चित्र पाहत आहेत.
पालिकेने जे फलक लावले त्या ठिकाणीच अशी विदारक परिस्थिती असेल तर शहरातील ठिक ठिकाणच्या रस्त्यावर काय परिस्थिती असेल याबाबत चर्चा होताना दिसून येत आहे.पालिकेच्या या सूचना फलकालाच केराची टोपली दाखवली का ? असा प्रश्न उपस्थित राहत (Alandi) आहे.