Team MyPuneCity –आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा आढळून आला आहे.प्रथम स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीच्या जवळील परिसरात थोरवे यांच्या उसाच्या शेतात स्थानिक नागरिकांना तो दिसला.आज सकाळी पुन्हा त्याच परिसरात बिबट्या आढळून आला.यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्याची माहिती वनरक्षक यांना देण्यात आली.ते तत्काळ तेथील परिसरात आले.
वनरक्षक गवळी यांनी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन केले. व माहिती पत्रक दिले.तसेच ते यावेळी म्हणाले बिबट्या सोबत लहान पिल्ले असल्याने तो येथे राहत आहे.लहान पिल्ले घेऊन त्याला या परिसराततून बाहेर पडता येत नाही. लहान पिल्ले असल्याने पिंजरा लावू शकत नाही.पिंजरा लावल्यास लहान पिल्लांना इजा झाल्यास तो आक्रमक होईल.
यामुळे रात्री वेळी गस्त घालू असे आश्वासन दिले. आषाढी वारी च्या अनुषंगाने तसेच येथील परिस्थिती पाहता मुख्याधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वनविभाग आधिकारी या संदर्भात बोलतील.
या परिसरात जनजागृती व दक्षतेसाठी फ्लेक्स लावू .तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला.स्थानिकांच्या माहिती नुसार त्या परिसरातील ८ ते १० कुत्रे बिबट्याने फस्त केलीत.तसेच ऊसाच्या शेतात लिंबाच्या झाडावर बिबट्या असल्याचे काहीनी पाहिले.
घ्यावयाची दक्षता /सूचना
कधीही बिबट्याचा पाठलाग करु नये. त्याला जखमी करु नये. तो उलटा हल्ला करु शकतो.
- मुलांना एकटे सोडू नये. मुलांनी घोळकाने फिरावे.
- अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला मोबाईलवर गाणे लावून जावे.
- बिबट्या दिसल्यास जोरात ओरडा करावा. खाली वाकू नये किंवा ओणवे झोपू नये. त्याचा कधीही पाठलाग करु नये.
- रात्री उघड्यावर झोपू नये.
- सायंकाळी व रात्री अनावधानाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समुहाने वावरावे.
- लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. एकट्याला सोडू नये.
- गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्याच हिताचे आहे.
- गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी.
- बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास नजिकचे वनपरिक्षेत्र कार्यालयास संपर्क साधावा.