Team MyPuneCity – आज दि.८ रविवार रोजी सकाळी 8 च्या सुमारास पितळी गणपती जवळील भक्त निवास शेजारी असणाऱ्या गांधी यांच्या माऊली प्रसाद इमारती मधील बंद खोलीस आग लागल्याची घटना घडली.
त्याची माहिती आळंदी अग्निशमन दलास कळवण्यात आली. तत्काळ आळंदी अग्निशमन दल,घटनास्थळी पोहचले. सदर आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ खोलीचा विद्युत पुरवठा बंद करून ती आग विझविण्यात आली. खोलीमधील सर्व साहित्य,पुस्तके-ग्रंथ, जीवनावश्यक साहित्य आगीत जळून खाक झाले .यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Harshal Alpe : ‘अर्वान’ लघुपटाला दिग्दर्शनासाठी ‘बेस्ट ऑफ पुणे’ पुरस्कार; हर्षल आल्पे यांचा सन्मान
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्नीशमन दल कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली.सदरची आग विझविताना स्थानिक नागरिकांसह, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे कर्मचारी यांची मदत झाली.

