situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : १७ जूनपासून पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना आळंदीमध्ये प्रवेशबंदी, अत्यावश्यक सेवा व वारकरी वाहनांनाच प्रवेश

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदीत ( Alandi) १९ जूनला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी दि.२० जून ला सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.हा सोहळा शहरात १७ जून ते १९ जून दरम्यान होणार आहे.या सोहळ्यासाठी आळंदीमध्ये लाखो भाविक येतात. या काळात आळंदी व परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ – पालखी सोहळ्याचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

यामुळे १७ जून ते १९ जून पर्यंत आळंदी शहरामध्ये वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.तसेच दि.२० रोजी श्रींचे आळंदी तून पुण्याकडे प्रस्थान होणार आहे.फक्त वारकऱ्यांच्या व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांना शहरामध्ये प्रवेश देण्यात येणार असून,इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे.वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा ,असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( Alandi) यांनी केले आहे.

Pimpri: तीन कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीतील तीन आरोपी अटकेत

जड – अवजड वाहनांस प्रवेश बंदी

१) प्रवेश बंदी मार्ग:- चाकण ते आळंदी(आळंदी फाटा चाकण) ,२) चिंबळी ते आळंदी (चिंबळी फाटा,चाकण)

पर्यायी मार्ग:- आळंदी फाटा – चिंबळी फाटा चाकण येथून – भारत माता चौक – पांजरपोळ चौक -अलंकापुरम चौक

३)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- शेल पिंपळगाव , वडगाव घेनंद ते आळंदी( कोयाळी कमान)
पर्यायी मार्ग:- शेल पिंपळगाव – वडगांव घेनंद – कोयाळी कमान – कोयाळी – मरकळ

४)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- मरकळ ते आळंदी (धानोरी फाटा)
पर्यायी मार्ग:- मरकळ – धानोरे फाटा – च-होली फाटा – मॅगझीन चौक/ अलंकापुरम

५)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- १)भारत माता चौक ते आळंदी( भारत माता चौक ,मोशी)
पर्यायी मार्ग:- भारत माता चौक – मोशी चौक – पांजरपोळ चौक – अलंकापुरम चौक २) मोशी – चाकण – शिक्रापूर

६)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- विश्रांतवाडी ते आळंदी( दिघी मॅगझीन चौक)

पर्यायी मार्ग:- १)पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी –
मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – च- होली फाटा – मरकळ
२) पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी –
मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – पांजरपोळ चौक ( Alandi)

आळंदी शहरात मध्यवर्ती भागात येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव च- होली फाटा चौक , डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक/बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड,धानोरे फाटा/पीसीएस चौक इ.ठिकाणाहून आळंदी कडे येणाऱ्या वाहनांना मनाई हवलदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून पुढे देहुफाटा येथून आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

एकेरी मार्ग

१)हवलदार वस्ती – तळेकर पाटील चौकातून उजवीकडे वळून आदित्य इंटरनॅशनल स्कूल – डुडुळगाव असा एकेरी मार्ग होणार असून डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदी पुलावरून चाकण मार्गे इच्छित स्थळी /डुडुळगाव चौकातून तळेकर पाटील चौक मार्गे हवालदार वस्ती ते मोशी चौक मार्गे इच्छित स्थळी.
२)भारतमाता चौक ते हवालदार वस्ती वाय जंक्शन ते उजवीकडे वळून मोशी हा मार्ग एकेरी करण्यात येत असून मोशी चौका कडून हवालदार वस्ती कडून भारत माता चौक येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई असणार आहे .

दि .२० रोजी पालखी मार्गावर येण्यास मनाई

विश्रांतवाडी – बोपखेल – आळंदी ,मरकळ – च -होली ते आळंदी ,मोशी चौक तसेच भारतमाता चौक ते हवालदार वस्ती मार्गे देहुफाटा आळंदी – आळंदी फाटा चाकण ते आळंदी , चिंबळी फाटा ते आळंदी , वडगाव घेनंद ते विश्रांत वड मार्गे आळंदी – पांजरपोळ चौक ते अलंकारपुरम चौक मार्गे आळंदी , मॅगझिन चौक,दिघी,बोपखेल, इ.ठिकाणी पालखी मार्गाला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या ( Alandi) सर्व प्रकारांच्या वाहनांना मनाई असणार आहे.

आळंदी परिसरातील पार्किंगची ठिकाणे ( Alandi)

१) आळंदी – देहू रोड – तळेकर पाटील चौक (दक्षिणेस) ३ एकर

२)आळंदी – देहू रोड तळेकर पाटील चौक (उत्तरेस)१ एकर

३) ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव जकात नाका जवळ – १० गुंठे

४)बापदेव चौक – ४.५ एकर

५) इंद्रायणी हॉस्पिटल समोर ( चाकण रोड ) ९ एकर

६) विश्रांतवड वडगांव रोड २५ एकर

७)मुक्ताई मंगल कार्यालयासमोर १ एकर ( Alandi)

Follow Us On