Team My pune city –आळंदी येथील इंद्रायणी घाटावर नव्याने ड्रेनेज लाईन झाली असून सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात ठिक ठिकाणी लीकेज असून त्या परिसरातील इंद्रायणी घाटावर त्यातील घाण पाणी इंद्रायणी घाटावर पसरत आहे.तसेच नदी मध्ये तर काही ठिकाणी भक्त पुंडलिंक मंदिरात जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Shankar Jagtap: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत चर्चविरोधात कारवाईची मागणी — आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना
नवीन लोखंडी तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ तर मोठ्या प्रमाणात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात तेथून पाणी वाहत आहे.ते घाण पाणी तेथील घाट परिसरात पसरून नदीत जात होते.त्या घाण पाण्यातून नागरिकांना रहदारी करणे कठीण होते.तसेच एका चेंबर जवळील फरशी घालून घाण पाणी येत होते.तसेच तेथील आजू बाजूच्या परिसरातून सुद्धा घाण पाणी येऊन ते भक्त पुंडलिक मंदिरात जात होते.यामुळे नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Dehugaon:देहूत डॉक्टर्स असोसिएशनकडून वृक्षारोपण
प्रशासनाने सदर ठिकाणी योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.नव्यानेच झालेल्या ड्रेनेज लाईन ला गळती लागल्याने संबंधित ठेक्केदार ,अधिकारी कर्मचारी यांनी व्यवस्थित नियोजन पूर्वक कार्य केले का याची तपासणी करावी.
