Team MyPuneCity – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा (Alandi) आषाढी वारी पालखी सोहोळा २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसेच यंदाचे वर्ष श्री संत ज्ञानदेवांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे.
PCMC : अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद…
हे औचित्य साधत माऊली भक्त संतोष गणपतराव मोरगे जि. नांदेड यांचेकडून ज्यामध्ये माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात त्या माऊलींच्या पालखीच्या नूतनीकरणासाठी १२ किलो चांदी माऊलीचरणी आज अर्पण करण्यात आली आहे .तसेच त्यानिमित्ताने लागणाऱ्या कार्यासाठी आणखी ४ किलो चांदी त्यांच्याकडून प्राप्त होणार आहे. मजुरीचा सर्व खर्च हे देणगीदार करणार आहेत. दि १२ जूनपर्यंत ते कार्य पूर्णत्वास येईल.याबाबत माहिती विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (Alandi)यांनी दिली.
तसेच आज माऊलींच्या पालखीचे चांदीचे नूतनीकरणा निमित्त विश्र्वस्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त रोहिणी पवार ,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माऊलींचे मानकरी राहुल चिताळकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित (Alandi) होते.