Team MyPuneCity – श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान यांच्या ( Alandi ) वतीने बहुरूपी गोंधळाचे आयोजन दि.८ रोजी आळंदीत करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे सादरकर्ते भावार्थ देखणे हे होते तर यामध्ये अभय नलगे व इतर ३५ कलाकार सहभागी होते.
MLA Mahesh Landge : शहरातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
बहुरूपी भारुडात प्रथमतः जुनी जात्या वरची,मोटे वरची गीते( Alandi ) याची लय बद्धता सांगून आताची त्या गाण्याची पद्धती बद्दल विवेचन केले . तद्नंतर ज्ञानोबा तुकाराम चा नामघोष करत दिंडी व पालखी सोहळा सादर करण्यात आला. विठ्ठल टाळ,विठ्ठल दिंडी,विठ्ठल उचारा, विठ्ठल बोला या विठ्ठल गीताने सर्व भाविक विठ्ठलमय झाले.राज्या बद्दल माहिती देत सांगितले महाराष्ट्र संतांची भूमी आहे, शूर वीरांची भूमी आहे.महाराष्ट्रात लोककला शेकडो वर्षांपासून मनोरंजन व प्रबोधन करते. महाराष्ट्रात अनेक लोककला आहेत.इतक्या लोककला दुसरीकडे नाहीत.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मॉक ड्रिल
या बहुरूपी भारुडात वासुदेवाच्या , कडक लक्ष्मी,गोंधळी भूमिकेत विश्वस्त भावार्थ देखेणे दिसले. वासुदेवाचे महत्व,दान महत्व ,भारतीय संस्कृती ,वासुदेव मोरपीस टोपीच डोक्यावर धारण का करतो ,याबाबत देखणे यांनी माहिती देत सामाजिक जनजागृती पर संदेश दिले. रात्र संपली दिवस उगवला, वासुदेव माझे नाव ,वासुदेव माझे नाव,दान पावलं सुमधुर गीते सादर करण्यात ( Alandi )आली.

तसेच या बहुरूपी भारुडात भविष्य सांगणारे जोशी कलाकृती सादर करताना भविष्य सांगणारे जोशी, पाटील ,नाना व गावातील तरुण तसेच कडक लक्ष्मी सादरकरणा वेळी हास्यरंग उमटले.मनमुराद पणे त्या कथेच्या वेळी हसून त्यास टाळ्यांनी हजारो उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमावेळी समाजप्रबोधन करत भाव भक्तीचे महत्त्व सांगण्यात आले.अंध व्यक्ती नारि भूमिकेत असणारे अभय नलगे यांचे कौतुक करण्यात आले.सत्वर पाव ग भवानी आई,असला दादला नको ग बाई अशी भारुड गीते सादर करण्यात आली.जागरण गोंधळ या कार्यक्रमाततून सामाजिक संदेश देऊन या कार्यक्रमा अखेर अवधूत गांधी यांच्या गीताने श्रोते मंत्र मुग्ध झाले.यावेळी सर्व कलाकारांचा सन्मान ( Alandi ) करण्यात आला.