Team My Pune City –बौद्ध धर्मातील वर्षावास कालावधीत पावसाळ्याचे (Alandi Devachi)चार महिने बौद्ध धर्मग्रंथांचे वाचन, पठण, चिंतन आणि विपश्यना यांसाठी समर्पित असतात. या परंपरेचा भाग म्हणून तक्षशिला बुद्ध विहार, आळंदी देवाची यांच्यावतीने बौद्ध उपासकांसाठी वर्षावास धम्म सहल आयोजित करण्यात आली.
या सहलीत बौद्ध धर्मातील पवित्र व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात (Alandi Devachi)आली. पहिल्या टप्प्यात दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्थळावर सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. त्यानंतर बाबासाहेबांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानी भेट देण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे आयु. मोहिते यांनी बाबासाहेबांच्या समाजकार्यास उजाळा देत त्यांच्या वापरातील वस्तूंबाबत सविस्तर माहिती दिली.
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक


यानंतर गोराई येथील गोल्डन पॅगोडा धम्म विपश्यना केंद्रास भेट देऊन उपस्थितांनी विपश्यना साधना केली. या धम्म सहलीत आनंदराव रणदिवे, नामदेव सुरपल्लिकर, विलास रणपिसे, प्रवीण रंधवे, विनायक गायकवाड, बाप्पू रायकर, सुभाष भोसले, बाळासाहेब दा. भोसले, अशोक थोरात, नितीन थोरात, किसन मोझाड, विश्वनाथ थोरात, आण्णा वाघमारे, संजय रंधवे, चारुदत्त रंधवे, रवींद्र रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहलीत सहभागी झालेल्यांनी बौद्ध संस्कृतीचा वारसा, धम्म साधना आणि बाबासाहेबांच्या कार्यतत्त्वांची प्रेरणा घेऊन ती समाजकार्यासाठी उपयोगात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.