केळगाव येथील श्री संत भगवानबाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई, संस्थेवर तात्काळ बंदी आणि संबंधित इतर गुन्ह्यांची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले.हे निवेदन अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आज देण्यात आले.
या निवेदनात लिहिले आहे की, आळंदी (केळगाव) येथील श्री संत भगवानबाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका युवतीला डांबून ठेवून अमानुष अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. सदर युवती शिकवणीसाठी दाखल नव्हती; तिला फसवून अपहरण करून संस्थेत आणले गेले व तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदर गुन्हाची शेवगाव पोलिस स्थानकात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत.
Talegaon Dabhade:श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक
इतर गंभीर बाबी मध्ये निवेदनात केलेले आरोप
बाळासाहेब सानप याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असून त्याने आरोपीना मदत केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याची सखोल चौकशी करून सहआरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश करावा.
कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांना १० लाख रुपयांचे आणि १० तोळे सोन्याचे आमिष देऊन मुलीला डांबून ठेवण्यासाठी आरोपीचा भाऊ सांगत होता, ही बाब सुद्धा गंभीर असून तात्काळ चौकशी होणे आवश्यक आहे.