Team My Pune City –लाडक्या बाप्पाचे सर्वत्र ढोल ताश्यांच्या गजरात,(Alandi)फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले.आळंदी शहरात गणेशोत्सव निमित्त विविध आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जय गणेश प्रतिष्ठाण यांनी कोल्हापूर मधील आकर्षक सुंदर अंबाबाई मंदिराची प्रतिकृती साकारली आहे, जय गणेश ग्रुप मंडळाने आकर्षक सुंदर उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर प्रतिकृती,एकलव्य मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईसह मंदिर,राजे ग्रुप यांनी ह्रदयस्पर्शी ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा देखावा सादर केला आहे.
अमरज्योत मित्र मंडळानेबालाजी मंदिर प्रतिकृती ,बालाजी गणेश मूर्ती,श्री दत्तनगर प्रतिष्ठाण मंडळाने आकर्षक मंदिर,विद्युत रोषणाई,न्यु दत्तनगर ग्रुप यांनी पॅलेस व आकर्षक विद्युत रोषणाई,शिवस्मृती प्रतिष्ठाने १५ फुटी लालबाग राजाची आकर्षक मुर्ती,अमरदिप मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई,धर्मराज गणपती मंडळाने पॅलेस,आकर्षक विद्युत रोषणाई,कै. बाबाशेठ मुंगसे पा. प्रतिष्ठाण आकर्षक मंडप सजावट व विद्युत रोषणाई, सद्भावना ग्रुप आकर्षक मंडप सजावट,नवशिवशक्ती तरुण मंडळ हरिकीर्तन ,भजन व विद्युत रोषणाई,शिवतेज मित्र मंडळ ,व्यापारी तरुण मंडळ,राजे शिवछत्रपती मंडळ आकर्षक गणेश मूर्ती व विद्युत रोषणाई,
माऊलीं पार्क बाल मित्र मंडळ केदारनाथ डोंगर,आकर्षक विद्युत रोषणाई व लहान मुलांच्या स्पर्धा अयोजित केल्या होत्या.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
Chakan: .. तर चक्काजाम करून टाका – मनोज जरांगे पाटील



शहरातील देखावे पाहण्यासाठी हळूहळू गर्दी होत आहे.हनुमान तरुण मंडळाने यावर्षी घुंडरे परिवारातील आप्तेष्टांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून साध्या पध्दतीने गणेश उत्सव साजरा केला.तसेच वडगांव चौक व मरकळ रोड,दत्त मंदिर परिसर,पद्मावती रोड व आळंदी परिसरातील गावातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे,विद्युत रोषणाई केली आहे.