Team My pune city – आज शनी आमवस्येनिमित्त (Alandi) आळंदीमधील इंद्रायणी नदी घाटाजवळील शनी मंदिरात सकाळपासून भाविकांची श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी होती. शनी आमवस्येनिमित्त भाविक शनिदेवाला तेल,रुईमाळ, पुष्प,मीठ ,काळे उडीद,श्रीफळ अर्पण करत होते.
Aundh Crime News : औंधमध्ये वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याला रिक्षाचालकाकडून सिमेंटच्या गट्टूने मारहाण

मनोकामना पूर्ण व्हावी तसेच सदैव कृपा आशीर्वाद सोबत(Alandi) रहावा यासाठी त्यांची आराधना, स्तोत्र,मंत्र पठण भाविक करत होते.मंदिर परिसरात अगदी भक्तीमय वातावरण तयार झाले होते.तसेच काही भाविक शनी आमवस्ये निमित्त गरजू,गरीब व्यक्तींना वस्त्र,वस्तू,धान्य,आर्थिक अश्या विविध प्रकारे दान करत असतात.
Pune-Lonavala Local : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेवर तिसरी-चौथी लाइन ; लोकल प्रवाशांना मोठा दिलासा
शनी आमवस्ये निमित्त इंद्रायणी काठी भाविकांची(Alandi) गर्दी होती.पवित्र इंद्रायणी नदी मध्ये काही भाविक स्नान करत होते. इंद्रायणी मातेची पूजा व आरती करत होते.शनिदेव हे ज्योतिषशास्त्रात न्यायाची देवता मानली जाते, जे लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात.
शनी आमवस्ये निमित्त ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरात मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मारुतीरायास सुद्धा तेल,रुईमाळ, पुष्प,मीठ ,उडीद,श्रीफळ भाविक अर्पण (Alandi) करत होते.