situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये 1994-95 च्या बॅचचा रंगला विद्यार्थी मेळावा

Published On:

Team My Pune City –शाळा म्हणजे आठवणींचा पुरेपूर साठा, (Alandi)शिक्षक, आनंद, चेष्टा मस्करी, शिक्षा अशा विविध प्रकारच्या आठवणीतून ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याची एक सुवर्णसंधी म्हणजेच हा स्नेह मेळावा.

आज दिनांक 03/08/2025 रोजी मैत्री दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे 1994 – 95 साली दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा बहुप्रतीक्षित गेट – टुगेदर मेळावा उत्साहात पार पडला. सुमारे 30 वर्षांनी जुने मित्र एकत्र आल्याने आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी प्रबोधनकार ह. भ. प. संग्राम बापू भंडारे, जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे तसेच शाळेतील माजी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि 1994 – 95 च्या बॅचमधील विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.


Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक; उद्या नवलाख उंब्रेच्या भैरवनाथ मंदिरात सभा

Pimpri: डोळ्यांची वेळीच काळजी घेतल्यास दृष्टी वाचवता येईल -नेत्रतज्ञ डॉ. वैभव अवताडे यांचे प्रतिपादन

भाऊसाहेब कारेकर व संग्राम बापू भंडारे यांनी मैत्रीचे स्वरूप व जीवन जगत असताना मैत्रीचे महत्त्व याविषयी आपले विचार व्यक्त केले. अजित वडगावकर यांनी संस्थेच्या सात दशकांच्या या विकास कार्यामध्ये त्या त्या काळात मदत केलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांच्या ईतरही बॅचने कुठे हॉटेलात किंवा मंगल कार्यालयात स्नेह मेळावा आयोजित न करता तो आपण ज्या विद्यालयात घडलो त्या विद्यालयात करावा क्या करता संस्था सर्वतोपरी मदत करेल असे विचार मनोगतात व्यक्त केले व शाळेला पाच डायस ची मदत केल्याबद्दल ह्या बॅचचे आभार मानले व असेच पुढे सहकार्य या संस्थेच्या विकास कार्यात सर्वांनी करावे असे आवाहन केले.

जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा आणि अनुभव शेअर केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्यांची मैफल, आणि शिक्षकांचा सत्कारही यावेळी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास वहिले यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सचिन येळवंडे यांनी केले. व कार्यक्रमाच्या निमित्ताने कॅप्टन वीरेंद्र गायकवाड व संतोषी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्याचे यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी उमेश रानवडे, अनिल थोरवे, अशोक थोरवे, दीपक वाबळे, लक्ष्मण उभे, शोभा मुसळे, माने ताई, गणेश कोद्रे, वृंदा गोतकुलवार तसेच बॅचचे सर्व मित्र यांनी एकत्र येऊन केले होते.

शाळेच्या जुन्या इमारतीपासून ते वर्गातील आठवणी, सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा बालपण अनुभवण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुढेही अशा गेट-टुगेदरचे आयोजन करण्याचे ठरवले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून सन 1994 – 95 च्या बॅच मेंटनी ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्या शाळेसाठी आपली आठवण म्हणून पाच डायस भेट म्हणून दिले. तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सोमनाथ मुंगसे यांनी व्यक्त केले.

Follow Us On