Team My pune city – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सुवर्ण महोत्सवी (७५० वे) जन्म वर्ष ( Alandi ) आहे. या उत्सवानिमित्त सुवर्ण कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दि.१३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना’श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ , विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव वर्ष २०२४-२५ उत्सवानिमित्त आयोजित ‘सुवर्ण कलशारोहण’ कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
Pune: शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान
आज आळंदी शहरात दि.१४ रोजी सायंकाळी ४ वाजता सुवर्ण कलश दर्शन मिरवणूक होणार आहे.त्याचा प्रारंभ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरा पासून होणार आहे. तसेच दि.१५ रोजी सायंकाळी पाच वाजता श्रींचा रथोत्सव होणार असून त्याचा प्रारंभ चाकण चौक( Alandi ) येथून होणार आहे.
Rashi Bhavishya 14 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
दि.१५ रोजी माऊली मंदिरावर सुवर्ण कलाशारोहण होणार आहे.श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवी वर्षा निमित्त मंदिर व परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई ( Alandi ) करण्यात आली आहे.