Team My Pune City –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच(Alandi) जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी परतीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत.दि.२० रोजी आळंदीकडे दुपारी २ ते रात्री ८ वाजे पर्यंत च्या दरम्यान सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
वाहतूक बंद करण्याचे मार्ग :- पुणे मार्गे आळंदी येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (अलंकापुरम चौक /च – होली फाटा चौक)
पर्यायी मार्गे:- १)अलंकापुरम चौक – जय गणेश साम्राज्य – मोशी – चाकण २) च – होली फाटा चौक – धानोरे फाटा चौक – मरकळ मार्गे
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- मोशी मार्गे आळंदी येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (डुडुळगाव जगात नाका)
पर्यायी मार्गे:- डुडुळगाव जकात नाका डावीकडे वळून केळगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- मरकळ चौक मार्गे आळंदी येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई(मरकळ चौक)
पर्यायी मार्गे:- मरकळ चौकातून वाहने पिसीएस चौक मार्गे /वडगांव चौक मार्गे इच्छित स्थळी
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- चाकण चौक आळंदी येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (चाकण चौक जोग महाराज संस्था)
पर्यायी मार्गे:- चाळीस फुटी रस्ता – वडगाव रोड – जिओ शोरूम – के के हॉस्पिटल – मरकळ रोड – पीसीएस चौक मार्गे इच्छित स्थळी
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- पुणे विश्रांतवाडी बोपखेल येथून देहूफाटा मार्गे चाकण जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास मनाई
(देहूफाटा चौक)
पर्यायी मार्गे:- डुडुळगाव मार्गे इच्छित स्थळी
Pune: पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- चाकण, आळंदी फाटा ते आळंदी जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास मनाई आळंदी फाटा
पर्यायी मार्गे :- आळंदी फाटा मार्गे इच्छित स्थळी
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- चाकण चिंबळी फाटा ते आळंदी जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास मनाई (चिंबळी फाटा)
पर्यायी मार्गे :- चिंबळी फाटा मार्गाचे इच्छित स्थळी
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:- जय गणेश साम्राज्य चौक ,मोशी ते अलंकापुरम चौक जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनास मनाई ( जय गणेश साम्राज्य,मोशी)
पर्यायी मार्गे :-जय गणेश साम्राज्य चौक साम्राज्य मोशी मार्गे इच्छित स्थळी.
दि.२० रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्याचे मार्ग:-
मॅगझिन चौकाकडून आळंदी कडेयेणारी वाहने रॉंग साईड मेन रोडने व आळंदी कडून पुण्याकडे येणारी वाहने बालाजी मंदिर चौकातून सर्विस रोडने मॅगझिन
चौकाकडे जातील.
दि.२१ रोजीचे वाहतूक बंद करण्याचे मार्ग/ पर्यायी मार्गे(सकाळी ७ ते रात्री ८)
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:-
चाकण चौक ते प्रदक्षिणामार्ग
सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (चाकण चौक)
पर्यायी मार्गे:- चाकण कडून येणारी वाहने चाकण चौकातून घुंडरे आळीकडे न वळता देहुफाटा मार्गे इच्छित स्थळी.
पुणे कडून येणारी वाहने चाकण चौक रोड वरून चाळीस फुटी रोड मार्गे इच्छित स्थळी.
वाहतूक बंद करण्याचे मार्ग:-
वडगांव चौक प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (वडगांव चौक)
पर्यायी मार्गे:- वडगाव चौकातून सरळ जाण्यास बंदी- सदरची वाहने वडगांव रोडवरील चाळीस फुटी रोड मार्गे इच्छित स्थळी जिओ शोरुम डावीकडे वळून के के हॉस्पिटल गल्ली – मरकळ मार्गे इच्छित स्थळी.
केळगाव चौक – घुंडरे आळी चौक सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास मनाई (केळगाव चौक)
पर्यायी मार्गे:- चाकण रोड वरुन चाळीस फुटी रोड मार्गे इच्छित स्थळी.
परतीचे मार्गावर वाहतुक बदल करण्यात येत असून नमुद ठिकाणांहून अत्यावश्यक सेवेतील वाहने, दिंडीतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.