Team MyPuneCity –दि.१ रोजी आळंदी येथील (Alandi)ज्ञानदर्शन धर्मशाळेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.एकूण २०९ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.यावेळी रक्तदात्यास अल्पोपहार व भेटवस्तू देण्यात आली.
या शिबिराचे आयोजन समाजातील गरजूंना वेळेवर रक्ताची मदत मिळावी या उदात्त हेतूने करण्यात आले होते. स्थानिक नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
Lonavala : लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यावरण व नागरी सुविधावर आधारित विकास आराखडा तयार करावा – उच्च न्यायालय

तसेच सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माऊलींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला.