Team MyPuneCity – गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मावळ परिसरात, धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली(Alandi) आहे.
Mauli Palkhi : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान
काल पासून आळंदी येथील भक्ती सोपान पुल पाण्याखाली आहे. भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून तेथील दगडी घाट पाण्याखाली आहे. भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली असून त्या वरील दगडी घाटावर पाणी आले(Alandi) आहे.
Maval Crime News : धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून
भक्ती सोपान पुलाचे काही रेलिंग पडून पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना इंद्रायणी नदी घाट परिसरात येण्यास बंदी आहे.पोलीस प्रशासन,एन. डी आर एफ टीम ,पालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी इंद्रायणी घाटावर तैनात असून वेळोवेळी नागरिकांसाठी स्पीकर द्वारे सूचना ते देत (Alandi) आहेत.