Team My pune city – आज दि.१९ रोजी अजा एकादशी निमित्त ( Alandi) माऊली मंदिरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी निमित्त मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.
Bhor News : रस्त्याअभावी जखमी वृद्धाला तीन किमी हातगाड्यावरून वाहून नेण्याची वेळ; भोर येथील घटना
भाविकांना एकादशी निमित्त मंदिरात उपवासाच्या प्रसादाचे( Alandi) वाटप करण्यात आले.नदी घाट परिसरात भाविकांची गर्दी दिसून येत होती.इंद्रायणी नदी घाटावर काही भाविक इंद्रायणी मातेचे पूजन,आरती करत होते. तसेच शहरातील ठीक ठिकाणच्या धर्मशाळेत हरी कीर्तनाचे ,हरी भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पावसात सुद्धा काही दिंड्या माऊलीच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात एकादशी ( Alandi) निमित्त प्रदक्षिणा पूर्ण करत होत्या.यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
काल पावसाने शहरात ,परिसरात हजेरी लावली होती.आज सुद्धा शहरात सकाळ पासून पावसाची संततधार चालू आहे.या ( Alandi) होत असलेल्या पावसामुळे आळंदी, परिसरातील शेतातील पिकांना फायदा होणार आहे.