Team My Pune City –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा(Alandi) दि.१० जुलै रोजी पंढरपूरहुन आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होता.दि.१८ व १९ रोजी पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामी होता.आज पुण्यातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने माऊलीच्या जयघोषात,हरिनाम गजरात भक्तिमय वातावरणात आळंदी दिशेने प्रवास सुरू केला.
आळंदी मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या स्वागतासाठी फुलसजावट करत आळंदी नगरपालिकेने कमान उभारण्यात आली होती.
पालिका व ग्रामस्थ यांच्या वतीने माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले.नगर पालिका चौकात पालखीचे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आगमन झाले.
पालखीच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.पालिका चौकात पालखीचे आगमन होताच मोठं मोठ्याने माऊलींचा जयघोष भाविकांनी केला.
Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे
Nigdi: निगडी प्राधिकरण येथे सशस्त्र दरोडा

खांद्यावर पताका,हातात टाळ , मृदुंग,विणा,डोईवर तुळशी वृंदावन तर काहींच्या डोईवर माऊलींची , विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ,तसेच ज्ञानेश्वरी व हरिपाठ ,अभंग गात, हरिभजनात दंग होत नृत्य करत,तर ठिक ठिकाणी फुगडी चा खेळ खेळत अश्या भक्तीमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले.शहरात वारकरी भाविकांसाठी ठिक ठिकाणी अन्नदान करण्यात आले.
माऊलींच्या पालखी रथावर आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.