Alandi : माऊलींच्या सर्व लेकरांनी उत्सवामध्ये सहभागी व्हायला यावे – योगी निरंजन नाथ

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (Alandi) आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त (सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव) शनिवार, दि. 3 मे ते शनिवार, दि. 10 मे या कालावधीत भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरीनाम सप्ताहाचे आळंदी येथे आयोजन करण्यात आले आहे.

Saint Dnyaneshwar Maharaj: संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदीत कार्यक्रम

ज्ञानेश्वरी पारायण, सकाळ कीर्तन, चरित्र चिंतन, प्रवचन, हरिपाठ, सायंकालीन कीर्तन,संगीत भजन असे विविध कार्यक्रम सप्ताहात होणार आहेत.हा सप्ताह ग्रामदैवत श्री भैरवनाथ पटांगण, नवीन सद्‌गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसमोर, चाकण रोड, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे होणार आहे. या उत्सवामध्ये सहभागी व्हायला माऊलींच्या सर्व लेकरांनी यावे अशी विनंती करतो (Alandi) प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी केली आहे.

Maval Online Launching : राजीव खांडेकर यांच्या हस्ते आज Mavalonline.com चा लोकार्पण सोहळा


तसेच सोहळ्य विषयी माहिती देताना म्हणाले भाविकांसाठी भव्य दिव्य मंडपाचे आयोजन केले आहे.पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी मोफत ज्ञानेश्वरी देण्यात येणार आहे.या सोहळ्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,कीर्तन प्रवचन (Alandi) व संत तुकाराम महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज कथा आहेत. आपण सर्वांनी या उत्सवात यायचे आहे. ज्ञानोबांकडे यायचे आहे माऊलींकडे यायचे आहे. आई कडे यायचे आहे. माहेरी यायचे आहे. उत्सव माऊलींचा आहे ,उत्सव आईचा आहे, उत्सव ज्ञानोबांचा आहे.पारायण सहभागी भाविकांसाठी मोफत ज्ञानेश्वरी,अन्नदान व निवास व्यवस्था माऊलींचीच आहे.असे यावेळी त्यांनी सांगितले.


तसेच पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखेणे,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त ह भ प चैतन्य महाराज कबीर,विश्वस्त रोहिणीताई पवार व विश्वस्त ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यावेळी म्हणाले श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त (सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव) शनिवार, दि. 3 मे ते शनिवार, दि. 10 मे या कालावधीत भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरीनाम सप्ताहाचे
आयोजन केले असून मोठ्या संख्येने भाविकांनी या सोहळ्यात सहभाग (Alandi) घ्यावा.

Follow Us On