Team My pune city – नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद/नगरपंचायत (Alandi)सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 23 जून 2025 रोजी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार आळंदी नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप प्रभाग रचना, विहित कालमर्यादेत नगरपरिषद स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार करण्यात आली. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेमार्फत मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांनी नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सादर केला होता.
Dahi handi : सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी आपची दही हंडी साजरी
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा दिनांक 16 जून 2025 च्या आदेशानुसार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी आळंदी नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिलेली आहे.
प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येत आहे. (Alandi)सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.एक ते नऊ प्रभाग हे २ सदस्यीय आहे तर प्रभाग क्रमांक दहा तीन सदस्यीय आहे.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
नागरिकांनी या कालावधीत आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात (Alandi) येईल. मात्र, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नाही.