Team MyPuneCity – आळंदी देवस्थानला यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदीकरांनी अनेक प्रकारच्या निशुल्क सेवा देण्याबाबतचे पत्र दिले आहे. यामध्ये दोन ट्रक दोन टँकर एक टेम्पो ह्या वाहनांसह अन्य काही सेवा संपूर्णतः निशुल्क आळंदी ते पंढरपूर पायी वारी मध्ये आळंदीकर देणार आहेत अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर( Alandi ) यांनी दिली.
Pimpri- Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’
याबाबत अधिक माहिती देताना चैतन्य महाराज कबीर यांनी सांगितले की आषाढी वारीमध्ये प्रत्येक वेळेस राज्यभरात ना अनेकदा ते विविध प्रकारच्या सेवा निशुल्क देत असतात. यामध्ये मानाचे बैल रथाला जोडले जातात त्या बैलांच्या खाण्याचे चारा ठेवण्यासाठी चे एक टेम्पो लागतो. हा टेम्पो आणि चाऱ्याचा संपूर्ण खर्च आळंदीकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
Kusgaon Crime News : कुसगाव येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
तसेच आळंदीतील वडगावकर कुटुंबाकडून अनेक वर्षांपासून दोन ट्रक आणि एक टँकर दिला जातो तोही पूर्णपणे निशुल्क स्वरूपात राहणार आहे. नुकतेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सव सोहळा निमित्त आळंदी मध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह झाला यावेळेस आळंदीकरांनी सर्व प्रकारच्या सेवानिष्ठपणे दिल्या होत्या.
संस्थांच्या आजपर्यंतच्या अनेक उपक्रमात आळंदीकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ही बाब विसरता येणार नाही. याचबरोबर आषाढी वारी मध्ये माऊलींची पालखी पंढरपुरातून पौर्णिमा दिवशी परतीच्या मार्गावर निघत असताना पंढरपूर ते आळंदीपर्यंत सोहळ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांना मोफत अन्नदान देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. साधारण दोन हजार वारकऱ्यांचे जेवण देवस्थान दोन वेळचे करणार आहे अशी माहिती श्री कबीर महाराज ( Alandi ) यांनी दिली.