अहिल्यानगरमधून अपहरण; वारंवार बलात्कार, लग्नासाठी जबरदस्ती, अॅसिड टाकण्याची धमकी, पीडितेच्या धक्कादायक तक्रारीने खळबळ
Team MyPuneCity –आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून, पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
महिलाच होती अपहरणात सहभागी
पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, २ जून २०२५ रोजी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा (MH 43 CC 7812) गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन
वारकरी शिक्षण संस्थेत बंदीवास आणि अत्याचार
नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
पोलिसांकडून तातडीने हस्तक्षेप
या घटनेनंतर पीडित तरुणीने ११२ आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन संबंधितांना आळंदी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, घाबरल्यामुळे पीडितेने तात्काळ तक्रार दिली नव्हती. नंतर तिने सर्व माहिती कुटुंबीयांना सांगितली आणि ७ जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
या प्रकरणात पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, सुनिता अभिमन्यु आंधळे आणि अभिमन्यु भगवान आंधळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्ती आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना उघड झाल्यापासून आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या इतर मुलींच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.