Team MyPuneCity – आज दि. 28 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ( Alandi) प्रदक्षिणा मार्गावर माहेश्वरी धर्मशाळेजवळ असणारे जुने राम फळाचे मोठे झाड अचानक वर्दळीच्या रस्त्यावर कोसळले.या रस्त्यावरून एक रिक्षा व दुचाकी जात होती ते काहीसे पुढे गेल्यानंतर ते झाड पडले.

यामध्ये रिक्षाचालक व दुचाकीस्वार थोडक्यात वाचले. झाड पडल्याची घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरराव येळवंडे यांनी एम डी पाखरे यांना दिली. पत्रकार एम.डी. पाखरे यांनी त्या ठिकाणी तत्काळ हजर होत संबंधीताना कळवले. झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होऊ लागली, मात्र वाहतूक पोलिसांना पाचारण करून देखील ते त्या ठिकाणी आले नाही, असे नागरिकांनी माहिती पाखरे यांना दिली.
ते जुने झाड पडल्यानंतर त्या भागातील विद्युत पुरवठा विद्युत विभागाच्यावतीने बंद करण्यात आला होता. झाडाचे खोड खराब झाल्यामुळे ते झाड अचानक पडले. ते झाड कोसळल्यानंतर वाहतूक समस्या निर्माण झाली होती.पालिकेच्यावतीने जेसीबी सहाय्याने ते पडलेले झाड तेथील मोकळ्या जागेत ठेवले,असे यावेळी नागरिकांनी ( Alandi) सांगितले.
यावेळी पालिका अग्निशमन दलाचे प्रसाद बोराटे, अमित घुंडरे ,स्थानिक नागरिक तुषार (बाळू )नेटके, ज्ञानेश्वर बनसोडे, रमेश नवलाखा,अरुण घुंडरे विशाल येळवंडे, कंधारे व विद्युत विभाग इ.सहकार्य ( Alandi) लाभले.