मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. काल (Alandi)पासून आझाद मैदानात त्यांनी आपल्या उपोषणाला सुरवात केली आहे.त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
मराठा समाजाने आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आरपार लढाई सुरू केली आहे.आरक्षण घेतल्या शिवाय परत न फिरण्याची भूमिका आंदोलकांकडून घेतली आहे.
त्यातच त्या परिसरातील खाऊगल्ली आणि हॉटेल बंद आहेत.त्यामुळे बहुतकरून काही आंदोलक उपाशी राहत आहेत.आझाद मैदान आणि तेथील परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी आहे.
मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.यासाठी लाखोंच्या संख्येने समाजबांधव तिथे आहेत.त्यांच्या जेवण्यासाठी राज्यातील विविध भागातील गावातून भाकरी ,चटणीचीसुविधा केली जात आहे.सकल मराठा समाज आळंदी शहर, परिसर यांच्या वतीने ही आळंदी व परिसरातील गावांमध्ये एक हात मदतीचा म्हणून भाकरी ,चटणी व सुके अन्न पदार्थ ,इ.देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Prakash Oswal: पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा-प्रकाश ओसवाल
त्यास आळंदीकर नागरिक व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आळंदीतील ज्ञानदर्शन धर्मशाळेत भाकरी,चटणी,चपाती,लोणचे पुडे,बिस्किट पुडे,मुरमुरे , फरसाण,पिण्याच्या पाण्याचे बॉक्स इ.आणून देत आहेत.आळंदीतून आळंदीकर नागरिकांसह वारकरी संप्रदायातून भाकरी चटणी व इतर अन्न पदार्थांची मदत होत आहे.यावेळी पीएमपीएल ग्रुप जय शिवराय कामगार संघटना, पुणे यांच्या वतीने तीन पोह्याचे कट्टे,एक तेल डबा,शेंगदाणे अशी मदत केली.जो पर्यंत मुंबईत ते आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आळंदीतून अशीच मदत कायम राहील असे सांगण्यात आले.


