situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदीत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Updated On:
Alandi

175 रक्तदाते, 250 नागरिकांची नेत्र तपासणी, 600 जणांचा सहभाग

Team MyPuneCity – श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने २५ मे रोजी वेदश्री तपोवन, आळंदी-मोशी रोड, हवालदार वस्ती, डुडूळगांव येथे आयोजित (Alandi) भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, संस्थापक अध्यक्ष, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास) अयोध्या आणि उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा यांचे शुभाशीर्वाद लाभले. या शिबिरात ६०० ते ७०० नागरिकांनी भेट दिली, १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर २५० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. मेडिकव्हर हॉस्पिटलच्यावतीने १०० हून अधिक नागरिकांना मोफत फॅमिली कार्ड देण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आळंदी शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.

Lonavala Crime : फार्म हाऊसवरील वाहतुकीच्या किरकोळ वादातून पर्यटकाचा निर्घृण खून

शिबिरात मोफत नेत्र तपासणी, रक्तदाब, रँडम ब्लड शुगर, वजन तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होता. स्पर्श ऑर्थो ॲण्ड चाईल्ड केअर क्लिनिकच्या सहकार्याने डॉ. स्वप्नील सोनार यांनी अपघात, फ्रॅक्चर, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, आमवात, कंबरदुखी, हाडांचा ठिसुळपणा यावर मार्गदर्शन केले. डॉ. आकाश दिघे यांनी बालरोग, कुपोषण, बाल दमा, कमी वजन, उंची वाढवणे, रात्री लघवी करणे (Alandi) आणि अनेमियावर उपचार केले.

कमलेश हॉस्पिटल, जगताप क्लिनिक, धारा हॉस्पिटल आणि मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. अक्षय शिंगणे , डॉ. भुषण जगताप , डॉ. सुनिल जगताप , आणि डॉ. सुहास गायकवाड यांनी सेवा दिल्या. मेडिकव्हर हॉस्पिटलचे अमोल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Alandi) फॅमिली कार्डद्वारे विशेष लाभ प्रदान करण्यात आले.

या शिबिराला भगवान पोखरकर , प्रकाश दादा वाडेकर , बबनराव कुऱ्हाडे , डी. डी. भोसले पाटील , योगी निरंजनाथ ,विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ॲड. रोहिणीताई पवार, निलेश पवार , विलास घुंडरे , रामशेठ गावडे , सचिन गिलबिले , सागर भोसले , मिलिंद भाऊ एकबोटे , ज्ञानेश्वर रायकर , पांडुरंग वहिले , नंदकुमार वडगावकर , वंदनाताई आल्हाट , योगेश तळेकर , सचिन तळेकर , गोकुळ काकड श्रीकांत चव्हाण , सागर पाचर्णे , ज्ञानेश्वर घुंडरे , रोहिदास कदम , साईनाथ ताम्हणे , शशिकांत बाबर , मनोहर दिवाने , श्याम कोळकर , योगेश पगडे , संजय चौधरी शंकरअण्णा घेनंद समीर जैद , सौरभ गव्हाणे, विशाल पं. तापकीर, मयूर भामरे, आशिष तापकीर, संतोष शेवाळे, विनायक महामुनी, नितीन ननवरे, सचिन शिंदे, नयनाताई झनकर, मनीषा थोरवे , सायरा शेख प्रदीप तळेकर, धनंजय मुंगसे, पवन जाधव, श्याम भापकर, हनुमंत चव्हाण, मोरे काका, स्वराज चव्हाण,आणि निलेश आढळराव पाटील उपस्थित होते.

वेदश्री तपोवन समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, स्वराज ग्रुप, जय गणेश ग्रुप आणि आळंदी-डुडूळगांव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. सर्व उपस्थितांनी शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प (Alandi) व्यक्त केला.

Follow Us On